Home > News Update > सटाणा तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

सटाणा तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

सटाणा तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी
X

Photo courtesy : social media

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सटाणा शहरासह ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे हजारो कुटुंबांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार भरविण्यासाठी परवानगी मिळावी,यासाठी आठवडे बाजार विक्रेता संघटनेच्या वतीने जोरदार मागणी केली आहे.

सटाणा शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे आठवडे बाजारात व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या हजारो व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सटाणाचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देत बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत सटाणा शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून बाजार सुरू करा अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Updated : 23 Aug 2021 1:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top