Home > News Update > दिल्लीतील जंतर मंतर येथील घटनेचा निषेध ; उपाध्यायवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिल्लीतील जंतर मंतर येथील घटनेचा निषेध ; उपाध्यायवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिल्ली येथील जंतर मंतरवर एका विशिष्ट समुदाया विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाचोरा येथील शिष्टमंडळाने केली आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथील घटनेचा निषेध ; उपाध्यायवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
X

जळगाव// दिल्ली येथील जंतर मंतरवर भाजपाचे अश्विनी उपाध्याय यांच्यासह इतरांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे देशात धार्मिकद्वेष निर्माण झाला असल्याचे म्हणत अश्विनी उपाध्याय यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जळगावच्या पाचोरा येथील एका शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय पाटील,पत्रकार प्रविण ब्राह्मणे यांच्यासह शिष्टमंडळाने

पोलिसांना एक निवेदन दिले,ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, अशा पध्दतीने घोषणा देऊन भाजप जणु काही दुसर्‍या फाळणीला जन्म देत आहे. एका विशिष्ट समाजाला लक्ष करून देशात धार्मिक विद्वेष निर्माण करुन त्या समाजाच्या नरसंहाराचे आवाहन करणारे हे समाज कंटक देशात आरजकता माजवु पाहात आहे. ही घटना धर्मनिरपेक्ष भारतीय लोकशाहीला जागतिक पातळीवर काळीमा फासणारी आहे.

भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता विधान मोडीत काढणारी ही घटना असून, संबंधितांवर भादवी १५३अ कलमा खाली गुन्हा दाखल व्हावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी डी. वाय एस पी काकडे, सहा. पोलीस निरीक्षक मोरे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Updated : 15 Aug 2021 1:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top