Home > News Update > जेएनयूमधील हिंसाचार, दिल्ली पोलिसांची स्वत:ला क्लीन चिट

जेएनयूमधील हिंसाचार, दिल्ली पोलिसांची स्वत:ला क्लीन चिट

जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारप्रकरणात चौकशी करणाऱ्या समितीने पोलिसांना क्लीन चिट दिली आहे. तर आतापर्यंत कुणालाही अटक झाली नसल्याने हल्ला कुणी केला? हा प्रश्न काय आहे.

जेएनयूमधील हिंसाचार, दिल्ली पोलिसांची स्वत:ला क्लीन चिट
X

दिल्लीतील जेएनएयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या फॅक्ट फाईंडींग कमिटीने बंदोबस्तावरील पोलिसांना क्लीन चिट दिली आहे. इंडिन एक्स्प्रेसने दिलेल् वृत्तानुसार या कमिटीने काढलेल्या निष्कर्षात त्या दिवशी जेएनयूमध्ये वातावरण चांगले नव्हते पण नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जेएनयूमध्ये 5 जानेवारी 2020 रोजी संध्याकाळच्या सुमारास काही जणांनी लाठ्या काठ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केली होती. यावेळी पोलिसांनी काहीही न करता बघ्याची भूमिका घेतली होती असा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्याच विद्यार्थी संघटनेची आइशी घोषसह 35 जण जखमी झाले होते.

याप्रकरणाचा तपास नंतर सीआयडीकडे सोपण्यात आला होता. पण आतापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

त्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जेव्हा जेएनयूमध्ये तोडफोड आणि हाणामारी सुरू होती तेव्हा पोलीस गेटवर का थांबले होते? कारण त्याच्या काही दिवसआधी पोलिसांनी जामीया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसून कारवाई केली होती. यावर स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितले की दंगेखोरांचा पिछा करत असताना आम्ही जामियामध्ये शिरलो होतो.पणऩ जेएनयूमध्ये विद्यापीठ प्रशासनाच्य़ा परवानगीशिवाय आम्हाला जाता नव्हते.

Updated : 20 Nov 2020 7:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top