राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक
X
एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसने संसदेबाहेरही याच मुद्द्यांवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले आबे. वाढत्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले आहे. संसद भवन ते राष्ट्रपती भवन असे आंदोलन काँग्रेसने केले.
यावेळी आंदोलन कऱणाऱ्या राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. संसदेत आणि रस्त्यावर देखील आम्हाला बोलू दिलं जात नाही राहुल गांधी, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. सोमवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॉंग्रेसच्या ४ खासदारांना पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला.
तानाशाही देखिए, शांतिपूर्ण प्रदर्शन नहीं कर सकते, महंगाई और बेरोज़गारी पर चर्चा नहीं कर सकते।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 26, 2022
पुलिस और एजेंसियों का दुरूपयोग करके, हमें गिरफ़्तार करके भी, कभी चुप नहीं करा पाओगे।
'सत्य' ही इस तानाशाही का अंत करेगा। pic.twitter.com/M0kUXcwH8L