सुल्ली डील अॅप तयार करणाऱ्याला अटक, दिल्ली पोलिसांचा दावा
X
'बुल्ली बाई' Application तयार करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता सुल्ली डील प्रकरणात देखील एका व्यक्तीला अटक केली आहे. नवीन वर्षाच्या तोंडावर मुस्लीम समाजातील महिलांचे फोटो त्यांना न सांगता बुल्ली बाई App द्वारे व्हायरल करण्यात आले होते. 6 महिन्यापुर्वी अश्याच प्रकारे सुल्ली App द्वारे मुस्लीम महिलांना टार्गेट करण्यात आले होते. दोनही अॅप तयार करताना होस्टिंग ओपन सोर्स प्लेटफॉर्म असलेल्या 'गिटहब' चा वापर करण्यात आला होता.
मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणात आत्तापर्यंत कमीत कमी तीन लोकांना अटक केली आहे. त्यामुळं दिल्ली पोलिसांवर मोठा दबाव होता. 6 महिन्यापुर्वी समोर आलेल्या सुल्ली डील प्रकरणात काय कारवाई केली. असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी 6 जानेवारीला बुल्ली बाई प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केल्याचा दावा केला होता.
काय आहे bulli bai प्रकरण?
सुल्ली डील Sulli deals वादानंतर मुस्लिम महिलांना पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे. शनिवारी 1 जानेवारी शेकडो महिलांचे फोटो एका अज्ञात ग्रुप द्वारे Github चा वापर करून बुल्ली बाई Bulli Bai नावाच्या अँप वर अपलोड करण्यात आले होते.
"सुल्ली" भावना भडकावण्याचा प्रयत्न
सुल्ली या शब्दाचा संदर्भ 'सुल्ला' या मुस्लिम समाजाशी असून या समाजामध्ये हा शब्द अत्यंत संतापजनक मानला जातो. तर 'बुल्ली बाई' हे त्याचं एक बदललेलं रूप मानलं जात आहे. द वायरच्या पत्रकार इस्मत आरा यांचं नाव देखील या ॲपमध्ये होतं. सुल्ली डील ॲपमध्ये लेखिका नबीया खान यांच्याही फोटोचा समावेश आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणावर सोशल मीडियावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.