Home > News Update > ED ला दणका, पत्रकार राणा अय्युबला देशाबाहेर प्रवासाची सशर्त परवानगी

ED ला दणका, पत्रकार राणा अय्युबला देशाबाहेर प्रवासाची सशर्त परवानगी

ED ला दणका, पत्रकार राणा अय्युबला देशाबाहेर प्रवासाची सशर्त परवानगी
X

देशातील विविध राज्यांमध्ये कारवाया करणाऱ्या EDला दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. मुंबई विमानतळावर अडवण्यात आलेल्या पत्रकार राणा अय्युब यांना दिल्ली हायकोर्टाने देशाबाहेर जाण्यासाठी सर्शत परवानगी दिली आहे. राणा अय्युब यांना लंडनला जात असताना EDने मुंबई विमानतळावर अडवले होते. राणा अय्युबवर मनी लाँडरिंगबाबत आरोप असल्याने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचे ईडीने सांगितले होते.

राणा अय्यबु यांच्यावतीने वृंदा ग्रोवर यांनी कोर्टात बाजू मांडली. राणा अय्युब ह्या सातत्याने ईडीच्या संपर्कात आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची त्यांची तयारी आहे, अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली. तसेच EDपासून काही लपवण्याचा प्रश्नच नाही, असाही दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर राणा अय्युब ह्या पत्रकार आहेत आणि सरकारला त्या परखड सवाल विचारतात म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राणा अय्युब यांनी केला. यानंतर कोर्टाने राणा अय्युब कधी परतणार या कोर्टाच्या प्रश्नावर त्या १२ एप्रिल रोजी परतणार असल्याची माहिती दिली. तर एटर्नी जनरल राजू यांनी राणा अय्युब भारताबाहेर गेल्या तर परतणार नाहीत, असा युक्तीवाद करत त्यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली. तसेच राणा अय्युब ह्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर जर संबंधित व्यक्ती तपासात सहकार्य करणार नसेल तर ED त्यांना अटक करत नाही, असा सवाल कोर्टाने विचारला. यानंतर वृंदा ग्रोवर यांनी केवळ चौकशी सुरू आहे म्हणून आपल्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा कशी काय आणली जाते आहे, असा सवाल राणा अय्यबुच्या वतीने उपस्थित केला.

यानंतर कोर्टाने राणा अय्यबु यांना परदेशात जाण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. यामध्ये राणा अय्युब यांना आपल्या परदेश दौऱ्याबाबत ईडीला माहिती द्यावी लागणार आहे. तसेच आल्यानंतर ईडीने दिलेल्या तारखेला चौकशीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे.

Updated : 4 April 2022 8:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top