Home > News Update > दिल्ली: अखेर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेला सुरूवात

दिल्ली: अखेर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेला सुरूवात

दिल्ली: अखेर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेला सुरूवात
X

केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिल्यानंतर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. दिल्लीमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची शेतकऱी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काही वेळापूर्वी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला शेतकऱी संघटनांचे जवळपास ३५ प्रतिनिधी उपस्थित आहेत.

मोदी सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, हे आंदोलन दिल्लीत येऊन धडकल्यानंतर मोदी सरकारला आता जाग आली आहे. संसदेतील बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने हे तिन्ही कायदे मंजूर करुन घेतले. मात्र, रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोदी सरकारला झुकावं लागण्याची शक्यता आहे. या शेतकरी कायद्याच्या विरोधात 32 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. दरम्यान याच मुद्द्यावरुन राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा मोदी सरकारला दिला आहे.

दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावलं आहे.

Updated : 1 Dec 2020 9:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top