दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीकडून आज अटक होणार? आपचे नेते कार्यकत्यांकडून ट्वीट
X
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्यावर कथित मद्यघोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने अरविंद अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना तीन वेळा समन्स बजावले होते. त्यानुसार, त्यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. परंतु,केजरीवाल यांनी हे समन्स धुडकावून लावले. परिणामी आज त्यांच्या घरावर इडी (ED) ची धाड पडण्याची शक्यता असून त्यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान यावर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक (sandip Pathak) यांनी ट्वीट केले आहे ते म्हणाले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या (४ जानेवारी) सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता आहे.” मंत्री आतिशी यांनीही अशीच पोस्ट करत म्हटलं, “ईडी उद्या सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकणार असल्याची बातमी येत आहे. अटक होण्याची शक्यता आहे.” याचा अर्थ असा की आज अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता असल्यांत समजतंय. दरम्यान, आपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आल्याचं ही सांगण्यात आलं आहे.