मुख्यमंत्र्यांचा बालीश असा उल्लेख केल्याने केसरकर संतापले
X
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालीश असा उल्लेख केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर चांगलेच संतापले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. यावेळी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा बालीशपणा चालणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावरून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिले.
शालेय शिक्षणमंत्री म्हणाले, संजय राऊत ज्या प्रमाणे बेलगाम बोलत होते. तसेच बेलगाम आता आदित्य ठाकरे बोलत आहेत. बेलगाम, बेजबाबदार किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे. त्यांनी असा पद्धतीने मर्यादा सोडून बोलू नये. नाहीतकर आम्ही स्वतःवर जी बंधने घातली आहेत, ती मुक्त होतील.
एवढंच नाही तर मी या सगळ्याला उद्या उत्तरं देईन. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी आरोप केले आहेत. ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. त्याची सडेतोड उत्तरं दिले तरच राज्याची परंपरा टिकू शकेल, असेही दीपक केसरकर म्हणाले.