लाल किल्ल्यावर निशाण साहिब झेंडा फडकवणाऱ्या दीप सिध्दूचा अपघातात मृत्यू
X
मुंबई : शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर शिखांचा झेंडा फडकवल्या प्रकरणी आरोपी असलेला पंजाबी समाजिक कार्यकर्ता आणि अभिनेता दीप सिध्दू याचा हरियाणातील पिपली टोलनाक्याजवळ मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 26 जानेवारी रोजी दिल्लीत हिसाचार झाला होता. त्या हिंसाचार प्रकरणी अभिनेता दीप सिध्दू याला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दीप सिध्दू जामीनावर असताना दिल्लीजवळील पिपली टोल नाक्याजवळ दीप सिध्दूच्या गाडीने ट्रकला धडक मारल्याने दीप सिध्दूचा मृत्यू झाला.
शेतकरी आंदोलकांनी 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील एका गटाला दीप सिध्दून दुसऱ्या मार्गाने वळवून लाल किल्ल्याकडे नेले. यावेळी दीप आंदोलकांनी निशान साहिब आणि शेतकरी मोर्चाचा हिरवा पिवळा झेंडा पडकवला होता. तर ही घटना घडत असताना दीप सिध्दू तेथे उपस्थित राहून व्हिडीओ बनवत होता. तसेच यावेळी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण होऊन हिंसाचार झाला होता. याप्रकरणी दीप सिध्दू याला अटक करण्यात आली होते. त्यानंतर दीप सिध्दू चर्चेत आला होता.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दीप सिध्दू चर्चेत आल्यानंतर त्याचे राजकीय संबंध उघडकीस आले होते. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर दीप सिध्दूने फेसबुकवर स्पष्टीकरण दिले होते. त्यामध्ये त्याने सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारचा झेंडा उतरवला नव्हता. तसेच आम्ही फक्त निशान साहिब आणि शेतकरी मजूर एकतेचा झेंडा फडकवला होता. माझ्यासोबत असलेला जमाव संतप्त होता. त्यामुळे आम्ही कोणालाही भडकवले नाही. तर जमावाने उत्साहाने अशा प्रकारचे कृत्य केले. त्यानंतर दीप सिध्दूला अटक केली होती. दरम्यान वादात सापडलेल्या दीप सिध्दूच्या मृत्यूमुळे दीप सिध्दूचा खरंच अपघात असेल की घातपात याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.