पुण्याचही डीप क्लिनिंग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे शहराचेही आता डीप क्लिनिंग होणार आहे. ह्या संदर्भातील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे या शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून डीप क्लिनिंग चे महत्व हे अधिक आहे.
X

पुण्यामधील प्रमुख रस्ते, फुटपाथ, मोठे महत्त्वपूर्ण चौक, धार्मिक स्थळे, अधिक वरदळीची ठिकाणे, पादचारी मार्ग आणि इतर महत्त्वपूर्ण ठिकाणे यांचं डीप क्लिनिंग हे मुंबई व ठाणे शहरांच्या धरतीवर होणार आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहराच्या डीप क्लिनिक बाबतच्या सूचना या दिल्या आहे. पुणे डीप क्लिनिंग संदर्भातील सूचना दिल्यानंतर सदर कामाची सुरुवात कधीपासून पुण्यामध्ये होते हे पाहणेमहत्त्वाचे ठरेल. या संदर्भात पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि ठाणे यांच्या डीप क्लिनिंग संदर्भामध्ये काम चालू असताना विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री यांच्यावर मिश्किल टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता पुण्याला नक्की डीप क्लिनिक ची गरज आहे का. या संदर्भात देखील चर्चांना उधाण आले असून. पुणेकर या डीप क्लीनिंग चे स्वागत कशाप्रकारे करतील की, पुणेरी पद्धतीने याच्यावर टीका करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.