Home > News Update > आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री राणे एकाच मंचावर

आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री राणे एकाच मंचावर

आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री राणे एकाच मंचावर
X

आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्यासह देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद हा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी

त्यांना थेट अटक करण्यात आली होती. त्यानंतर यांच्यातील वैर अधिकच वाढले आहे. 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण आज होणार आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते एकमेकांना भेटणार का, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू होत असून त्याची लँडिंग चाचणी पूर्ण झाली आहे. कोरोनाची पार्श्वभूमीवर मोजक्या हा निमंत्रितांच्या उपस्थितीत या विमानतळाचे लोकार्पण होत आहे. प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळींला निमंत्रित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ कोणी सुरू केलं यावरून सिंधुदुर्गात मोठं राजकारण पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे विमानतळ मी बांधून पूर्ण केलं असं म्हटले आहे, तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे विमानतळ आपल्या काळात पूर्ण झालं असून आपल्याच काळात सूरु होत आल्याचं म्हटले आहे.

दरम्यान आजच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकच मंचावर येत असल्याने राजकिय सामना रंगण्याची शक्यता आहे.

Updated : 9 Oct 2021 7:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top