Home > News Update > एकमेकांच्या झुंजीत दोन वाघांचा मृत्यू ; ताडोबातील घटना

एकमेकांच्या झुंजीत दोन वाघांचा मृत्यू ; ताडोबातील घटना

एकमेकांच्या झुंजीत दोन वाघांचा मृत्यू ; ताडोबातील घटना
X


चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेमध्ये दोन वाघांचे मृतदेह दिसून आले. एकमेकांच्या झुंजीत या दोन वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोस्टमॉर्टम रीपोर्टनंतर या वाघांच्या मृत्यूंचे कारण स्पष्ट होणार आहे.

वाघाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची सगळीकडे ओळख आहे. ज्यामधील वाघांनी जगातील पर्यटकांचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. परंतू याच ताडोबात वाघांची मृत्यूंची साखळी सुरु झाली आहे. दोन वाघांचे मृतदेह आढळून आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर कोळसा वनपरिक्षेञात झरी उपवन क्षेञाचा समावेश होतो. झरी कक्ष क्रमांक 338 परीसरातील खातोडा परीक्षे़ञात गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना दोन वाघांचे मृतदेह दिसून आले पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा टी 142 नर असून अंदाजे वय दोन वर्षे असून दुसरा वाघ टी 92 हा वाघिणीचा बछडा आहे.

20 ते 21 जानेवारी दरम्यान झालेल्या रात्रीच्या वाघांच्या झुंजीत या दोन वाघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. वाघांचे मृतदेह टीटीसी येथे पाठवले आहे शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. घटनास्थळावर उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरीक्षेत्राधिकारी काटकर, बंडू धोत्रे, मुकेश भांडतकर, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे हो उपस्थित होते.

Updated : 23 Jan 2024 6:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top