MaxMaharashtraImpactमिठात मृतदेह : अखेर मुंबईत होणार पोस्टमॉर्टेम
X
45 दिवसा मिठात ठेवलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबातील लोकांनी नकार दिल्याने अखेर त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईला रवाना करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडित आदिवासी महिलेचा मिठात ठेवलेला मृतदेह 45 दिवसांनी बाहेर काढण्यात आला. यासंबधीचे वृत्त सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रने दिले होते.
त्या महिलेची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबातील लोकांनी केला आहे. हत्या झाली असतांना आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत पीडितीचेक्षचे वडिल अंतरसिंग वळवी यांनी नव्याने तपासणी करण्याची मागणी केली होती.
धडगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या शवविच्छेदनात न्याय न मिळाल्याने अंत्य संस्कार न करता पालकांनी मृतदेह 45 दिवसांपासुन मिठाच्या खड्यात पुरुन ठेवला होता. नंदुरबार जिल्हा पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास नसल्याने आपल्या मुलीचे मुंबईतच पोस्टमार्टेम व्हावे अशी मागणी केली होती .
अखेर रात्री पोस्टमार्टेमसाठी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक मुंबईच्या जे जे हॉस्पिटल येथ अँबुलन्सने मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना आत्महत्येस प्रवृत्त केले या कलमाखाली अटक केली आहे.मात्र आता मुंबईतील पोस्टमार्टेम मध्ये काय रिपोर्ट येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.