Home > News Update > अजितदादांची विधानसभेत 'मास्क-गिरी'

अजितदादांची विधानसभेत 'मास्क-गिरी'

अजितदादांची विधानसभेत मास्क-गिरी
X

सडेतोड स्वभाव साठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालण्याचा आग्रह धरतात. आज विधानसभेत जेव्हा अजित दादा मास्क वापरावरुन भडकले त्यावेळेस सर्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांचे हनुवटी वरील मास्क नाक आणी तोंडापर्यंत पोहोचले होते.

अजित दादा सभागृह म्हणाले, आपण चार चार- पाच पाच लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून या सभागृहात येतो. कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव आजूबाजूला होत असतानाही सभागृहात आणि विधिमंडळाच्या आवारात काही आमदार आणि मंत्री अपवाद वगळता मास्क घालत नाहीत.

जगभरात कोरोना वाढत आहे. नवीन व्हायरसचा भाऊ आला आहे. एक दीड दिवसात दुप्पट रुग्णांची संख्या झाल्याचा आपण परदेशात पाहिला आहे. प्रसारमाध्यमे जागृत आहेत कृपया सगळ्यांनी नियमाचं पालन करून मास्क घालावेत असं आवाहन अजित पवार यांनी केला.

त्यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व सदस्यांनी आणि मंत्र्यांनी मास्क घालून नियमांचं पालन करावं असं सांगितलं.त्यानंतर या चर्चेवर पडदा पडला परंतु अजितदादांच्या भाषणानंतर सर्वच आमदारांनी आणि मंत्र्यांनी मास्क घातल्याचं सभागृहात दिसुन आलं.


Updated : 23 Dec 2021 2:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top