कारखाना चालवणं येड्यागबाळ्याचे काम नव्हे, अजित पवारांचा पंकजा मुडेंना टोला
X
"साखर कारखाना चालवण्यासाठी चांगले नेतृत्व लागते, ते येड्यागबाळ्याचे काम नाही" या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. बीड जिल्ह्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या डिसलरी उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. इतर पक्षातील नेते फक्त भाषण आणि टीका करतात प्रत्यक्ष काम करत नाहीत असे म्हणत मुंडे भगिनींना टोला लगावला.
वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे असताना फार चांगल्या पद्धतीने सुरू होता, मात्र आता या कारखान्याची परिस्थिती बिकट आहे, कारण कारखाना चालवण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज लागते आणि आज नेतृत्व कमी पडत असल्याची टीका अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग होत असताना खासदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ते होऊ शकले नाही हे खासदाराचे अपयश आहे असे म्हणत अजित पवार यांनी थेट खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.