Home > News Update > Budget 2022 : दळणवळणावर बजेटमध्ये भर, एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद

Budget 2022 : दळणवळणावर बजेटमध्ये भर, एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद

Budget 2022 : दळणवळणावर बजेटमध्ये भर, एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद
X

राज्याचे वर्ष २०२२-२३ साठी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केले. यावेळी अजित पवार यांनी सुरूवातीलाच सांगितलेल्या पंचसुत्रीमधील एक महत्त्वाचे सूत्र असलेल्या दळणवळणातील सुधारणांवर सरकारने भर दिला आहे. गतिमान वाहतूक दळणवळणासाठी ७ हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी १५ हजार ६७३ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

यावेळी अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली. हा महामार्ग आता थेट गोंदिया, गडचिरोलीपर्यंत नेला जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली. त्याचबरोबर शिर्डी विमानतळावरुन रात्रीच्या वेळी उड्डाणाची सोय करण्यात येणार असल्याचे सांगत यासाठी १५० कोटींची तरतूद केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्त ६ हजार ६५० कीमी रस्ते तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद

तसेच गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासाठी अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महामंडळासाठी जवळपास ३ हजार इकोफ्रेंडली नवीन बसेस देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर बस स्टेशनचा दर्जा सुधारावा यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याकरीता एसटी महामंडलासाठी सुमारे ३ हजार ३ कोटीं रुपये निधी दिल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. गडचिरोलीमध्ये नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर राज्यातील इलेट्रिक वाहनांची संख्या वाढवून २०२५ पर्यंत ५ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

दळणवळणासाठी सरकारची तरतूद

* मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत 10,000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची तरतूद

*हजार ५५० कि.मी. लांबीच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

*16039 कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु.

*मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक ३, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्ग‍िकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत

*पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.

*शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ

Updated : 11 March 2022 4:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top