कोरोनावरील भारतीय लस लांबवणीवर
कोरोनावरील लस लवकरच येईल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पण या लसींचा आपत्कालीन वापर तूर्तास तरी लांबणीवर गेला आहे.
X
कोरोनावरील भारतीय लस कधी येईल याची प्रतीक्षा संपूर्ण देश करत असताना एक धक्कादायक बातमी आलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेले अर्ज केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने तुर्तास स्थगित केलेले आहेत. त्यामुळे या लसींच्या आपत्कालीन वापराचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.
भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या लसींच्या चाचण्यांबाबत अधिक तपशील सादर करावा असे देखील या समितीने दोन्ही कंपन्यांना सांगितलेले आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीचा आपत्कालीन वापर तूर्तास तरी होऊ शकणार नाहीये. कोरोनावरली आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी असा अर्ज फायझर या परदेशी कंपनीने भारत सरकारकडे केला होता. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी देखील अर्ज केले होते.
यामुळे कोरोनावरील लस लवकरच येईल अशी आशा निर्माण झाली होती. पण तज्ञ समितीने यासंदर्भात अधिक तपशील देण्याची मागणी केल्याने या कंपन्यांना आता हा तपशील सादर केल्यानंतरच पुढील प्रक्रिया होऊ शकणार आहे.