Truck Drivers Protest | सलग दुसऱ्या दिवशी ट्रक चालकांचा संप; वाहतुकीवर परिणाम तसेच भाजीपाला,पेट्रोल ची टंचाई
X
केंद्र सरकारच्या नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूक युनियनच्या संघटनांनीनी सलग दुसऱ्या दिवशीहि आपला संप सुरूच ठेवला आहे. सरकारने केलेल्या या नव्या कायद्यात १० वर्षाची शिक्षा आणि ७ लाखाच्या दंडाची तरदूत केली आहे. हा नवा कायदा आमच्यासाठी अन्यायकारक आहे असे म्हणत महारष्ट्रातील ट्रान्स्पोर्ट युनियन या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.फळे,अन्नधान्य,फळे,भाजीपाला व इंधन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे .त्याची टंचाई होण्यास सुरवात झाली आहे .पेट्रोल व डीझेलसाठी नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत.
नाशिक मध्ये १ हजार ५०० ट्रक,टँकर चालक रस्त्यावर उतरले.
कांदा उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्यातहि संप पुकारण्यात आला आहे जिल्यातील सुमारे दीड हजार ट्रक व टँकर चालक संपात सामील झाले आहेत . याचा मोठा परिणाम फळे,भाजीपाला व पेट्रेल टंचाई वर होत आहे.पेट्रोल तसेच डिझेल मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्यास सुरवात होत आहे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार,जळगाव तसेच मराठवाड्यातील वाहतूक संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत .
मराठवाड्यातहि संपाचा परिणाम
मराठवाड्यातील धाराशिव,हिंगोली,,नांदेड,लातूर या जिल्यात हि संपाचा परिणाम दिसून आला असून लोक पेट्रेल, डिझेलसाठी पेट्रोल पंपावर लांबच्यालांब रांगा लागत आहेत . खरतर काल दुपारपासूनच टंचाईची बातमी व्हाट्सअप वर फिरत होती लोकांनी तेव्हापासूनच पंपावर गर्दी करायला सुरवात केली होती .
नागपूर विदर्भातील ट्रक चालकांचा संप मागे
नागपूरसह विदर्भातील संघटनांनी संप मागे घेतला असून आता वाहतूक व पुरवठा पूर्ववत होणार आहे .इंधन पुरवठाहि पूर्ववत होत आहे.
काय आहे नव्या कायद्यात
नव्या हिट अँड रन कायद्यात अपघातात दोषी आढळल्यास १० वर्षाची शिक्षा आणि ७ लाखाच्या दंडाची तरदूत या नव्या कायद्यामध्ये केली आहे. अपघातानंतर चालकाने जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावे तसे न केल्यास त्यात चालक दोषी आढळ्यास तो शिक्षेस पात्र असेल या नव्या कायद्यचा विरोध ट्रक व टँकर चालकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.