Home > News Update > वाशिम जिल्ह्यात सलग 9 दिवसांच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान

वाशिम जिल्ह्यात सलग 9 दिवसांच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान

वाशिम जिल्ह्यात सलग 9 दिवसांच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान
X

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग 9 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील शेलू खडसे,गणेशपूर,करडा,कामरगांव,जानोरी,कोठारी,अमानी या गावांसह रिसोड,मालेगांव,वाशिम,मंगरुळपीर,कारंजा आणि मानोरा या 6 तालुक्यातील जवळपास दीड लाख हेक्टर हुन अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं आहे.




या पावसामुळं उभ्या सोयाबीनला अंकुर फुटले असून , कापणी केलेलं सोयाबीन सडलं आहे. तर शेतात पाणी साचलेलं असल्यानं जमिनीचं ही प्रचंड नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनावर बहुतांश शेतकऱ्यांचा वार्षिक उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी यंदा 3 लाख हेक्टर वर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.




यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने सोयाबीनचे पीक घेतले व पीक चांगले बहरलेही मात्र, ऐन सोयाबीन काढणीस आले असतांना निसर्गाने शेतकऱ्यांवर मोठा आघात केला. शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला सोयाबीनचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठे आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Updated : 29 Sept 2021 1:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top