Home > News Update > जामनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

जामनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

जामनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
X

जामनेर तालुक्यामध्ये काल झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांची देखील पडझड झाली आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

काल झालेल्या वादळ आणि पावसामुळे जामनेर तालुक्यातील मका ,कपाशी, आणि केळी ही हातातोंडाशी आलेली पिकं भुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे कंबरडे मोडले आहे.



गेल्या दीड वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना एक ही रुपयाची मदत दिली नाही ,आता तरी सरकारने जागे होऊन त्वरित मदत या शेतकऱ्यांना द्यायला हवी आहे ,फक्त पंचनामे सरकार करत आहे मदत केव्हा देणार अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Updated : 8 Sept 2021 12:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top