Home > News Update > दलित पँथर पुन्हा मैदानात , मल्लिका ढसाळ यांची मुंबईतून घोषणा

दलित पँथर पुन्हा मैदानात , मल्लिका ढसाळ यांची मुंबईतून घोषणा

दलित पँथर पुन्हा मैदानात , मल्लिका ढसाळ यांची मुंबईतून घोषणा
X

महाराष्ट्रात दलित पँथर पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याची घोषणा दलित पँथरच्या पक्षश्रेष्टी मल्लिका नामदेव ढसाळ यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथील पत्रकार परिषदेतून मल्लिका नामदेव ढसाळ यांनी पँथरची नवी कार्यकारिणी घोषित केली. यावेळी त्यांनी दलित पँथरचे पूर्व अध्यक्ष राम तायडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी ध्येय धोरणे राबवणे तसेच पक्ष शिस्तीचा भंग करण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. यावेळी नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. दलित पँथर पक्षश्रेष्टी मल्लिका नामदेव ढसाळ, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ, राष्ट्रीय महासचिव डॉ. संगिता विष्णू ढसाळ महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष कविता मगरे दलित पँथर जेष्ठ नेते रमेश भाई पारधे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दलित पँथरने पुढीलप्रमाणे आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

१) रोजगार योजना

सध्या आपण बघत आहात बहुतेक मोठे प्रकल्प महाराष्ट्र बाहेर चाललेत आणि जे काही आहेत तुटपुंजे त्यांच्यामुळे कोकणाचं समृद्ध रूपच हरवणार आहे . दलित पॅंथर रोजगार योजना घेऊन येत आहे त्यात तरुणांच्या हाताला काम मिळेल .

२) स्त्रियावरच्या अत्याचारासाठी आम्ही पँथर्स बायकर्स रात्रीच्या गस्तीसाठी ठेवणार आहोत कुठे माता बहिणींच्या अब्रूवर घाला घालण्यास जे नराधम असतील त्यांना पॅंथर त्यांच्या पद्धतीने धडा शिकवतील कायद्याच्या भाषेत. यासाठी पोलीस खाते आम्हाला सहकार्य करण्यास तयार आहेत.

३) महिलांसाठी लघुउद्योग यासाठी आम्ही व बँक व महिला यांची सांगड घालून आमच्या माध्यमातून त्यांना भाजी, वडापाव वा झुणका भाकर व इतर छोटे उद्योग यासाठी कर्ज मिळवून देऊ. त्यामुळे आमच्या भगिनी स्वावलंबी होतील.

४) ज्येष्ठांना औषधोपचारासाठी मोठा खर्च असतो तो ही आपली. दलित पॅंथर सोडवेल त्यासाठी पॉलिसी घेता येतील आणि पाच लाखांपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मदत मिळेल अशी ही योजना आहे. अशी ही योजना या सर्व योजना सर्वसामान्यांसाठी आहे ज्यांना रोजच जगणं म्हणजे लढणं वाटतंय ज्यांचे प्रश्न हे खूप जटील आहेत पण तेच सोडवण्याचं व्रत ज्या नामदेव ढसाळ यांनी घेतलं त्या सर्व ध्येय धोरणाचे आम्ही बांधील आहोत . ज्यांना सत्ता आणि त्यामुळे मिळणारे फायदे यातच त्यांचे लक्ष आहे त्यांना लाथाडून आम्ही पुढे जात आहोत.

५) जर आम्हाला सत्ता हवी असेल तर ती डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली असेल यात सर्व समाजाचे जे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित असतील त्यांना त्यांचे हक्क देणे हे आमचं प्रथम कर्तव्य असेल कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे वचन सांगितले की माझी जमात शासन करती जमात व्हायला पाहिजे. कारण की त्यांना माहीत होतं जे शासन करते आपले नसतात ते आपली मान मुरगळतात.

Updated : 12 Sept 2024 5:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top