Biparjoy Cyclone | गुजरातमध्ये जोरदार पाऊसाची सुरूवात; पंतप्रधानांसह, गुजरात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
X
सध्या जगभरात बिपरजॉयने वादळाची चर्चा सुरू आहे. यामुळे भारत पाकिस्तानाला(Pakistan) या वादळाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान सह गुजरात (Gujarat) या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. याच संदर्भात बिपरजॉयने लँडफॉल केल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्याशी चर्चा केली आहे.
दरम्यान चक्रीवादळ बिपरजॉयची तीव्रता अत्यंत तीव्र होती. गुरुवारी रात्री गुजरातच्या किनारपट्टीती भूभागावर हे वादळ आदळले. असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले आहे.
आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “चक्रीवादळ बिपोरजॉय ईशान्येकडे सरकले आणि गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळील पाकिस्तान किनारपट्टीला लागून असलेल्या सौराष्ट्र-कच्छला ओलांडले. चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीकडे सरकले असून ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने पूढे सरकरत आहे. या बिपरजॉयची चक्रीवादळाची तीव्रता 105-115 किमी प्रतितास इतकी कमी झाली आहे. त्याची श्रेणी अत्यंत तीव्र चक्री वादळ (VSCS) बदल होत, गंभीर चक्री वादळ (SCS) मध्ये बदलली आहे. आज १६ जून रोजी राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बिपरजॉयने भयानक वादळानंतर गुजरात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावर मुख्यंमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत माहिती दिली, “गुजरातकडे येणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आज उशिरा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. यावेळी माननीय पंतप्रधानांनी गीर जंगलातील सिहांसह वन्य प्राण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची माहितीही घेतली.
पटेल यांनी ट्विट करत म्हणाले की "बिपरजॉय चक्रीवादळाच्या सद्यस्थितीची माहिती राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राला भेटून घेतली आहे . ते किनारपट्टीच्या जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत तपशील घेत असल्याचे सांगितले.