Home > News Update > Cyberfrauds : मुंबईकरांची ऑनलाईन तब्बल ६१५ कोटी रूपयांची फसवणूक

Cyberfrauds : मुंबईकरांची ऑनलाईन तब्बल ६१५ कोटी रूपयांची फसवणूक

Cyberfrauds : मुंबईकरांची ऑनलाईन तब्बल ६१५ कोटी रूपयांची फसवणूक
X

वाढत्या डिजीटल तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. याचा प्रत्यय सध्या आपण सगळेच घेतोय. विशेषतः स्मार्ट फोनचा वापर सुरू झाल्यापासून सायबर फसवणूकीचे प्रमाण वाढल्याचं दिसतंय. आता हेच पाहा एकट्या मुंबईतून तब्बल ६१५ कोटी रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय.

२०१३ ते जून २०२३ या कालावधीत मुंबईकरांची ऑनलाईन तब्बल ६१५ कोटी रूपयांची फसवणूक झालीय. यापैकी सर्वाधिक फसवणूक ही कोरोना काळात २०१९ ते २०२१ दरम्यान तब्बल २६४ कोटी रूपयांची फसवणूक झालीय. मुंबई पोलिसांनी माहिती अधिकारात ही माहिती दिलीय. कोरोना काळात इंटरनेटचा वापर आणि त्याचबरोबर सायबर फसवणूकीचे प्रमाण वाढलं होतं, असंही आकडेवारीतून स्पष्ट झालंय. कोरोना काळात झालेल्या फसवणूकीच्या २६४ कोटी रूपयांपैकी फक्त ४१ लाख ८ हजार रूपयांची वसूली करण्यात पोलिसांना यश आलंय. तर मागील दहा वर्षात झालेल्या ६१५ कोटी रूपयांच्या फसवणूकी पैकी फक्त १२ कोटी ७ लाख रूपयांचीच वसूली पोलिस प्रशासन करू शकलंय. कल्याण इथल्या यामिनी एन यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या अर्जाला सायबर पोलिसांनी दिलेल्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आलीय.

२०१३ ते जून २०२३ या दरम्यान मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणूकीचे १९ हजार १७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात पाच सायबर पोलिस ठाण्यातील ३ हजार १४४ गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशा गुन्ह्यांच्या सिद्धतेचं प्रमाण हे ९.१ टक्के आहे. याचाच अर्थ १९ हजार १७५ प्रकरणांपैकी फक्त १ हजार ७४० प्रकरणं निकाली निघाली आहेत.

Updated : 20 Aug 2023 10:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top