क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक
X
पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी किरण गोसावीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. फरारी आरोपी असलेल्या किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलीस काही दिवसांपासून प्रयत्नात होते. पुणे पोलिसांचे पथक गोसावीच्या मागावर उत्तर प्रदेशात दाखलही झाले. पोलीस पथक लखनऊमध्ये पोहचले, गोसावीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर पोलीस होते. मात्र, गोसावी तेथून निसटला होता. पुणे पोलिसांची दोन पथकं गोसावीच्या मागावर आहेत. पण गोसावी पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत रावेत येथे काल संध्याकाळी दाखल झाला. गेल्या 15 दिवसांपासून किरण गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. आता त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
एनसीबीच्या कारवाईनंतर आपल्याला सुरक्षितरित्या घेऊन जाण्यासाठी आर्यन खाननं मला विनंती केली होती. म्हणून मी त्याचा हात हातात घेऊन त्याला धावत जात होतो. आता प्रभाकर साईल यानं यासंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर मला मीडियापुढं आणि कोर्टासमोर येऊन बोलणं गरजेचं बनलं होतं, त्यामुळं मी आलो आहे, असं गोसावी यांनं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितल्याचे समजतंय.