Home > News Update > 'मगरमच्छ निर्दोष है' राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

'मगरमच्छ निर्दोष है' राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

मगरमच्छ निर्दोष है राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
X

देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत राहुल गांधी सतत केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. मग विषय वाढत्या रुग्ण संख्येचा असो की लसीच्या कमतरतेचा असो... किंवा पीएम केअर फंड सारख्या मुद्दय़ाचा असो. वारंवार आपल्या ट्विटरद्वारे मोदींवर टीका करण्याचं काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या सोबत आता कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते देखील भाजपवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी मोदींवर टीका करायला सुरवात केली आहे. लसीच्या कमतरतेपासून तर काळ्या बुरशीच्या वाढत्या प्रादुर्भावापर्यंत... एवढं काय तर पंतप्रधान मोदींच्या रडण्यावर देखील काँग्रेस सध्या सरकार जोरदार टीका करताना दिसत आहे.

शनिवारी संध्याकाळी राहुल गांधींनी आपल्या ट्विटरद्वारे एक चार्ट शेअर केला आहे, ज्यात आशिया खंडातील देशांमध्ये कोव्हीडमुळे झालेला मृत्यूदर दाखवण्यात आला आहे. तसंच आशिया खंडातील जीडीपी चा उल्लेख या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. या चार्टमध्ये भारत हा सगळ्यात खाली असल्याचं दिसत आहे. राहुल गांधींनी हे ट्विट करत पंतप्रधानांच्या अश्रूंवर निशाणा साधला आहे.

त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात -

लस नाही

सगळ्यात खाली घसरलेला जीडीपी

मृत्यूंची संख्या सर्वोच्च

सरकारच्या प्रतिक्रिया मोदींच्या रडण्यावर येत आहेत.)

दरम्यान राहुल गांधी यांनी 'मगर निर्दोष आहे" असं ट्विट केलं होतं. वाराणसीतील आरोग्य कर्मचार्‍यांशी चर्चेदरम्यान पंतप्रधान भावूक झाले होते. त्यानंतर राहुल यांनी मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दात जोरदार निशाणा साधला होता.

यासोबतच काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील आता मोदींवर टीका करत ट्विट केलं आहेत. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदींविरोधात केलेल्या एका ट्विटमध्ये ते म्हणतात

लेकिन 22 मई की हकीकत बताती है कि सिर्फ 4.1 करोड़ लोगों को कोरोना की दोनों डोज लग पाई है. उन्होंने आगे लिखा कि 21 मई को सरकार दावा कर रही है कि साल के अंत तक सभी देशवासियों को कोरोना की वैक्सीन लगाई जा चुकेगी लेकिन सच्चाई ये है कि 21 मई को पूरे दिन में 14 लाख लोगों को टीके की खुराक दी गई. जयराम रमेश के अनुसार देश को वैक्सीन की जरूरत है, आंसुओं की नहीं.

दावा - जानेवारी २०२१ : मोदी सरकार जुलैच्या अखेरपर्यंत ३० कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण करेल.

वास्तव - २२ मे : ४.१ कोटी भारतीयांनाच आत्तापर्यंत दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

दावा - २१मे : २०२१ च्या अखेरपर्यंत सर्व भारतीयांच लसीकरण पूर्ण होईल.

वास्तव - २१ मे ला पूर्ण दिवसभरात केवळ 14 लाख लसीकरण पूर्ण झाले आहे.

आम्हाला अश्रूची नाही लसीची आवश्यकता आहे !

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत 2021 च्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचं लसीकरण करण्याच्या स्थितीत असेल. दरम्यान 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोरोना महामारी बाबत झालेल्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार "भारत ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान 216 कोटी लसीचे डो, खरेदी करेल, तर 51 कोटी डोस यावर्षी जुलैपर्यंत खरेदी केले जातील."

अशी माहिती दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आयएमएफ ( इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) आणि जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील लसीकरणाच्या गतीबाबत चिंता व्यक्ती केली असून याच्या परिणांमाबाबत भारताला इशारा दिला आहे. ट्विटद्वारे केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, जर लसीकरणाची गती वाढली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखणे शक्य होणार नाही.

Updated : 23 May 2021 1:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top