सूर्याला पडली भेग...जगभरातले संशोधक चिंताग्रस्त...
सूर्याचा एक मोठा भाग निखळल्याचे आता समोर आले आहे. तसेच सूर्याला एक भेग सुद्धा पडली आहे. यामुळे जगभरातील संशोधक चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांनी याबाबत आपले काय निरिक्षण नोंदवले आहे? जाणून घेवूया...
X
आपण आकाशात पाहिले की, दिवसा सूर्य ( Sun ) तर रात्री चंद्र ( Moon ) हे दोन मोठे तारे दिसून येतात. आपण त्यांना तेजस्वी तारे ( Bright stars ) म्हणून ओळखतो. आता या सूर्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या या सर्वात मोठ्या ताऱ्याला म्हणजेच सूर्याला एक भेग पडली आहे. तसेच या तळपणाऱ्या ताऱ्यापासून म्हणजेच सूर्यापासून एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. सूर्यापासून वेगळा झालेला हा भाग आता सूर्याभोवतीच फिरतो आहे. सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळच हा तुकडा प्रदक्षिणा ( circumambulation ) घालतो आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून ही घटना पाहण्यात आली आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक ( Scientist ) चकीत आणि चिंतित झाले आहेत.
नासाच्या ( NASA ) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे निरिक्षण नोंदवले आहे की, सूर्यापासून त्याचा एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. आता हा भाग सूर्याभोवती फिरतो आहे. हा भाग वेगळा झाल्याने सूर्याला एक मोठी भेग पडली आहे, असे महत्त्वाचे निरिक्षण सुद्धा नोंदवण्यात आले आहे. मात्र अंतराळात नेमके काय घडले आहे. याबाबत जगभरातील वैज्ञानिक चिंताग्रस्त झाले आहेत. याबाबत काही अभ्यासकांनी ही घटना अपेक्षित नसल्याचे सांगितले आहे. सौर चक्राच्या ११ वर्षाच्या कालावधीत अशी घटना घडू शकते. तसंच अशा प्रकारची घटना सौर चक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते असंही काही अभ्यासकांनी म्हटले आहे.