Home > News Update > कोरोना वाढीचा वेग मंदावला, 24 तासात 34 हजार 424 रुग्णांची नोंद

कोरोना वाढीचा वेग मंदावला, 24 तासात 34 हजार 424 रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसात वायूवेगाने वाढणारी कोरोना मंगळवारी मंदावली. तर 24 तासात 34 हजार 434 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 11 हजार 647 रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तर राज्यातील रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण 94.75 टक्क्यांवर पोहचले आहे.

कोरोना वाढीचा वेग मंदावला, 24 तासात 34 हजार 424 रुग्णांची नोंद
X

दररोज वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येला मंगळवारी काहीसा ब्रेक लागला. मंगळवारी 24 तासात 34 हजार 434 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३, ५३१ रुग्ण आढळले असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २,१९९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर राज्यातले १८, ९६७ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बाधित आढळण्याचं प्रमाण आता ९४.७५ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

राज्यात सध्या २,२१,४७७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी १,००,५२३ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. त्याखालोखाल ५२,०३१ सक्रीय रुग्ण ठाण्यातले असून पुण्यात २८,२०१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे. तिथे ४७ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज दिवसभरात २२ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातला मृत्यूदर २.०२ टक्के आहे.

राज्यात आज दिवसभरात ३४ नव्या ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २५ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातले असून पुणे ग्रामीण भागात ६ ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत. सोलापुरात २ तर पनवेलमध्ये ओमायक्रॉनचा एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता १,२८१ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ६०६ रुग्ण मुंबईतले असून पुणे महानगरपालिका क्षेत्रात २६७ ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत.

मुंबईत मंगळवारी तब्बल 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 413 झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते ज्यानंतर मागील 2 ते 3 दिवसांत ही रुग्णसंख्या काहीशी स्थिरावली आहे.

Updated : 11 Jan 2022 11:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top