कोविड संकटात अहमदनगरमधे कोविड सेंटर आणि विश्व महायज्ञावरून रंगला राजकीय कलगीतुरा...
X
संपूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट असताना भारतात कर्मा चा उद्रेक वाढला आहे महाराष्ट्रात रुग्ण संख्या कमी होत असली तरी मृत्यू चिंताजनक आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोविड सेंटरमधील श्रेयवाद आणि महायज्ञा सारख्या अवैज्ञानिक गोष्टींवरून चांगलेच राजकारण रंगल्याने सर्वसामान्य जनतेसाठीची आरोग्य व्यवस्था उघड्यावर पडली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारी बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील दैनिक आकडेवारी तीन हजारापेक्षा जास्त होती. ही आकडेवारी आता दोन हजार इतकी कमी झाली असेल तरी रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी अजूनही रुग्णांना वणवण करांना वेळ लागत असल्याची परिस्थिती आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरद चंद्र पवार यांच्या नावे कोबडी सेंटर सुरू केले असून ते सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे.
यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी स्थानिक भाजपचे नेते सुजित झावरे यांनी टाकळीढोकेश्वर येथे दुसरे कोरोनखऱ्यांटर सुरू केल्याने या कोरोना सेंटरमध्ये महाविश्व यज्ञ केल्याने खऱ्या अर्थाने वादाला तोंड फुटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच पारनेर तालुक्यातील भाळवणी येथिल आ.निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. आ.लंके यांच्या अत्याधुनिक अशा जम्बो कोविड सेंटरचे यावेळी त्यांनी कौतुक केले. लंके यांच्या कोविड सेंटर जवळच टाकली ढोकेश्वर इथे स्थानिक एका भाजप नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये विश्वशांती यज्ञ केल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी टीका करताना देशात भाजपचे नेतृत्व कोविडचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत गोमूत्र प्या, यज्ञ करा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी करत असल्याचे सांगितले. रुग्णांची सेवा करा, जनता सेवा करणार्यात देव पहाते असे सांगत त्यांनी आ.निलेश लंके यांच्या कामाचा दाखला यावेळी दिला.
याबाबत स्पष्टीकरण देतांना भाजप नेते सुजित झावरे यांनी म्हंटल आहे की, जर प्रार्थना करणे गुन्हा असेल तर मी गुन्हेगार मी आहे.आणि हा गुन्हा मी वारंवार करेल याहीपुढे मी पुन्हा विश्वशांती यज्ञ करेल सोबत झावरे यांनी नाव न घेता आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली. निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये महिलांना नाचवले जाते त्याकडे अनिस चे दुर्लक्ष का आहे? त्यांच्या कोविड सेंटर मध्ये बाबा बुवांना बोलावून महिलांना चाटण दिले जाते त्याबद्दल अनिस का बोलत नाही असा सवाल उपस्थिती केलाय. दरम्यान माझ्यावर हा आक्षेप केवळ राजकिय द्वेषापोटी घेतल्याच झावरे यांनी म्हंटल आहे.दरम्यान लंके यांच्या कोविड सेंटर ला भेट देण्यासाठी आलेल्या जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्यावर देखील झावरे यांनी टीकास्त्र सोडलय.दरम्यान लोकप्रतिनिधीनी उपलब्ध यंत्रणेला मजबूत करण्याऐवजी स्वतःचे खासगी कोविड सेंटर उभारून राजकिय दृष्टीकोन न ठेवता खऱ्या अर्थाने लोकसेवा करायला हवी अस मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जामखेड चे आमदार रोहित पवार म्हणाले,
कोविडच्या काळात अनेक लोक प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे? टाकळी ढोकेश्वर मध्ये विश्वमहायज्ञ कशासाठी केला हे माहित नाही? महाजन केल्यावर करू ना जातो या हेतूने जर अशा प्रकारचे यज्ञ केले असेल तर ते चुकीचे आहे, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितले. एकंदरीतच राज्यातील कुरणा संसर्गाचा प्रमाण कमी झाला असेल तर ग्रामीण भागातील करुणा संसर्ग वाढीचे प्रमाण कायम आहे त्यातच करुणा मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पुढे प्रश्नचिन्ह असताना अशा अवैज्ञानिक गोष्टींमुळे कुठेतरी देशाची आणि राज्याची कोरोना विरोधातील लढाई कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबत आरोग्य व्यवस्था कमी पडत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि श्रेयवादाच्या लढाई मुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.