#COVID19 – २४ तासात देशात १४,१९९ रुग्ण, २ राज्यांत ७४ टक्के एक्टिव्ह रुग्ण
X
नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १४ हजार १९९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनोबाधित रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १० लाख ५ हजार ८५० झाली आहे. यापैकी १ कोटी ६ लाख ९९ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ लाख ५० हजार ५५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर एकूण मृतांची संख्या आता १ लाख ५६ हजार ३८५ एवढी झाली आहे.
कोरोना संख्या वाढत असताना लसीकरणही वाढले
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देशभरात रविवारपर्यंत एकूण १ कोटी ११ लाख १६ हजार ८५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान सर्व राज्यांनी RT-PCR टेस्ट वाढवण्यावर भर द्वावा असे आवाहन इकमर ने केले आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशातील एकूण एक्टीव्ह कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ७४ टक्के रुग्ण फक्त केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही कोरोनोच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.