कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची टेस्ट करण्याची गरज नाही, ICMR चे नवे निर्देश
देशभर तिसरा लाटेच्या कोविड रुग्णांचे आकडे वाढत असताना कोविड-19 रूग्णांचे संपर्क (Covid High Risk Patients) जोपर्यंत उच्च-जोखीम म्हणून ओळखले जात नाही, तोपर्यंत त्यांची कोरोना चाचणी घेण्याची गरज नाही, असे असे ICMR ने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
X
खोकला, ताप, घसा खवखवणे, चव किंवा वास कमी होणे, धाप लागणे आणि श्वसनाची इतर लक्षणे अशा व्यक्तींची तपासणी करावी, असेही नव्या देशात सांगण्यात आले आहे.
होम आयसोलेशननंतर (Home Isolation) डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची टेस्ट करण्याची गरज नाही, असे आयसीएमआरच्या (ICMR) निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, खोकला, ताप, घसा खवखवणे किंवा चव किंवा वास कमी होणे आणि इतर कोविड यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील वृद्ध किंवा मधुमेह, उच्चरक्तदाब, फुफ्फुसाचा किंवा किडनीचा दीर्घकाळचा आजार इत्यादी सारख्या आजार असलेल्या व्यक्तींचीही तपासणी करणे आवश्यक आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
रूग्णालयांसाठी, ICMR ने निर्देश दिले की, टेस्टिंग सुविधेअभावी रुग्णांना इतर ठिकाणी पाठवले जाऊ नये. "सर्जिकल किंवा नॉन-सर्जिकल इनवेसिव्ह प्रक्रियेतून जात असलेल्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलांसह किंवा जवळच्या प्रसूतीची आवश्यकता असल्यास किंवा लक्षणे विकसित झाल्याशिवाय चाचणी केली जाऊ नये," असे निवेदनात म्हटले आहे.