कोरोनाचे संकट, मुंबईसाठी पुढील १० दिवस महत्त्वाचे
X
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे म्हंटले आहे. गेल्या पंधरा दिवसात राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे सरकार तर्फे काही निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे . दरम्यान मुंबईमध्ये सर्व उपक्रमांना परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या किती प्रमाणात वाढते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
त्यामुळे मुंबईमध्ये देखील काही निर्बंध लागू शकतात का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्वाची माहिती दिली आहे
"मुंबईत सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था सुरू केल्यानंतर काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल, असे आम्ही गृहित धरले होते. मात्र, आम्ही अपेक्षा केल्या होत्या त्यापेक्षा कमीच रुग्णसंख्या आढळली आहे. तरीही पुढील १० दिवस महत्त्वाचे आहेत. पुढील १० दिवसांत रुग्णसंख्या काय असेल, यावर पुढील निर्णय घेतला जाईल," अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्तसुरेश काकाणी यांनी दिली.