Home > News Update > कोरोनाचे संकट गंभीर, रायगड जिल्ह्यात परजिल्ह्यातील पर्यटकांना बंदी

कोरोनाचे संकट गंभीर, रायगड जिल्ह्यात परजिल्ह्यातील पर्यटकांना बंदी

कोरोनाचे संकट गंभीर, रायगड जिल्ह्यात परजिल्ह्यातील पर्यटकांना बंदी
X

रायगड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याबरोबरच मृत्युदर देखील वाढताना दिसतोय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 291 झाली आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 288 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 437 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 566 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

अलिबाग तालुका जिल्ह्याचे मुख्यालय असून तालुक्यातील अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. अशातच अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल झाल्ने शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबाग व अन्य पर्यटन स्थळांवर दाखल होत आहेत.

परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव दुपटीने वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोखण्याचा निर्णय घेतला आहे. माघारी फिरावे लागत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होतोय, पेझारी नाक्यावर कडक नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहे.

Updated : 20 Jun 2021 11:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top