Home > News Update > धक्कादायक : कोरोनाबाधीत बेपत्ता महिलेचा मृतदेह ८ दिवस हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये

धक्कादायक : कोरोनाबाधीत बेपत्ता महिलेचा मृतदेह ८ दिवस हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये

धक्कादायक : कोरोनाबाधीत बेपत्ता महिलेचा मृतदेह ८ दिवस हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये
X

जळगाव कोविड रुग्णालयात कोरोनाबाधीत बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवसानंतर मृतदेह हॉस्पिटलमधील बाथरूमंध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

भुसावळमध्ये राहत असलेल्या या ८० वर्षांच्या महिलेला कोरोना झाल्याने 1जूनला जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र 2 जून पासून ही महिला कोविड वॉर्डमध्ये आढळून आली नाही. कुटुंबीयांनी अखेर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पत्रकारांनी पालकमंत्री तसंच जिल्हाधिकाऱ्यांना बेपत्ता महिलेबाबत प्रश्न विचारला होता. महिलेचा शोध सुरू असल्याच सांगण्यात आलं. मात्र बुधवारी सकाळी सदर महिला कोरोना वार्डच्या बाथरूम मध्ये तब्बल आठ दिवसांनी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ह्या घटनेवरून जळगावच्या कोविड रुग्णालयात कोरोनाबधितांवर उपचारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतातहेत.

आरोग्य विभाग तसंच जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ काराभरामुळंच जळगाव जिल्हयाचा मृत्युदर अधिक आहे.

उपचारातून वाचणारा रुग्णही मृत्यूच्या दाढेत जातोय अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान सदर घटना गंभीर असून चौकशी करण्याचे आदेश देऊन दोषींवर कारवा़ई करण्यात येईल असं जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

Updated : 10 Jun 2020 5:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top