राज्यात 66 हजार 159 कोरोनाचे नवीन रुग्ण, काय आहे तुमच्या जिल्ह्याची स्थिती?
X
राज्यात लॉकडाऊननंतरही कोरोनाचे आकडे कमी होण्याचं नाव दिसत नाही. आज राज्यात ६६ हजार १५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झालं असून राज्यात आज आज ७७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५% एवढा आहे. तर दुसरीकडे आज राज्यात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ३७,९९,२६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.६९% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६८,१६,०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५,३९,५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,१९,७५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.