आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची परवड; रुग्णवाहिकेसाठी 14 तासांचा वेटिंग
X
जालना: कोरोना रुग्णांबाबत सरकारी यंत्रणा किती उदासीन आहे. याचा एक गंभीर प्रकार आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात समोर आला आहे. एका कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तब्बल १४ तास ताटकळत बसावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाचे लक्षणं दिसल्यानंतर हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर एका वृद्धाचा अहवाल काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास पॉझिटिव्ह आला. या रुग्णाची प्रकृती खालावत असल्यानं त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे स्थानिक डॉक्टरांनी निर्णय घेतला. मात्र, या रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्यानं रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल १४ तास हसनाबाद येथील शासकीय दवाखान्यातच ताटकळत बसावं लागलं.
नातेवाईकांनी १०८ नंबरवर कॉल करूनही रुग्णवाहिका मिळाली नाही. तर रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याचा आरोप या कोरोना बाधित रुग्णाच्या मुलाने केलाय.
विशेष म्हणजे जालना जिल्हा हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे जर आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर, इतर महाराष्ट्राचं काय हे न विचारलेलं बरं असचं म्हणावे लागेल.
तर यावर खुलासा करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर म्हणाले की,जवळच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी काही रुग्णवाहिका गेलेल्या होत्या. तर काही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी असल्यानं या रुग्णाला सेवा देण्यात आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला असून यापुढे अशी दिरंगाई होणार नाही