Home > News Update > नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
X

नागपूर शहरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

कधीपासून असणार लॉकडाऊन?

दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान जाहीर हा लॉकडाऊन असणार आहे. या 7 दिवसात नागपूरमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना संचारबंदी असणार आहे. (Lockdown In Nagpur) नागपूरमध्ये 10 मार्चला 2 हजार 399 रुग्ण आढळले होते. तर 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आज नागपूर मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.

काय सुरु?

शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती

चष्म्याची दुकाने सुरू राहणार

मार्च एंडिंगची कामे पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

दवाखाने सुरु राहणार

काय बंद?

मद्यविक्री बंद राहणार

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण शहरात कडक संचारबंदी

खासगी कार्यालये बंद राहणार

Updated : 11 March 2021 1:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top