Home > News Update > अखेर कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊन ठेपली: केंद्र सरकारची अधिकृत घोषणा

अखेर कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊन ठेपली: केंद्र सरकारची अधिकृत घोषणा

जागतिक महामारी कोरोनाच्या लाटेत जग गुरफटले असताना देशात आणि महाराष्ट्रात कमी झालेला कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्यानं चिंता वाढली होती. हा कोरोना उद्रेक दुसरी लाट आहे का? यावर अद्याप केंद्र आणि राज्य सरकारनं भाष्य केलं नव्हतं. परंतू आता महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी महाराष्ट्राला पत्र पाठवून अधिकृतरित्या कळवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून दुसऱ्या लाटेची सूचना देत कोरोना नियंत्रणासाठी अनेक सूचना दिल्या आहेत.

अखेर कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊन ठेपली: केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
X

नुकतेच केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्राची पाहणी करुन गेलं होतं. आता सध्या देशामधे सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या आणि कोरोना मृत्यूची संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली आहे. कॅान्टॅक्ट ट्रेसिंग, अलगीकरण, विलगीकरण आणि चाचण्या यांत फार कमी कार्यक्षम प्रयत्न केले जात आहेत, अशी खंत आरोग्य सचिवांनी मुख्यसचिवांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

केंद्रीय टीमच्या पाहणीनुसार महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनं फारसं काळजीत दिसत नाही. खूप उपाययोजना केल्या आधीच केलंय असा विचार विचारानेच पुढे त्रास होऊ शकतो, असा सक्त इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणांने दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटलंय की, "महाराष्ट्रात कोव्हिड 19च्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे. रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीयेत. ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोव्हिड 19पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत. कोव्हिडचा हा प्रसार रोखण्यासाठी वा थांबवण्यासाठी ऑगस्ट - सप्टेंबर 2020 प्रमाणे प्रशासकीय यंत्रणा सक्रीय करण्यात यावी, असा केंद्रीय पथकाचा निष्कर्ष आहे."

"यापुढच्या सूचनांमध्ये उल्लेख करण्यात आलेले सगळे महत्त्वाचे भाग आणि त्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना यांचं कठोरपणे पालन करण्यात यावं. सोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि गृह विभागाने कोव्हिड 19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि वेळोवेळी सांगण्यात येणारी मार्गदर्शक तत्वं यांचंही पालन संसर्ग रोखण्यासाठी करण्यात यावं," असंही त्यांनी म्हटलंय

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या महाराष्ट्राच्या सूचना :

-होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा.

-टेस्ट पॅाझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी करा

-प्रत्येक पॅाझिटीव्ह रूग्णाचे 20-30 contact टेस करा

-कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा

-राज्यातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत.

-नाईट कर्फ्यू आणि विकएंड लॅाकडाऊन केल्याचा फार कमी परिणाम संसर्ग रोकण्यासाठी होतो

-मुंबईत टेस्ट पॅाझिटीव्हीटी रेट 5 टक्के तर औरंगाबादमघ्ये 30 टक्के

-फिल्ड स्टाफला कॅान्टॅक्ट ट्रेसिंग समजलं नाही. हे कुटुंब आणि शेजार्यांपुरतं मर्यादीत राहिलंय

Updated : 16 March 2021 12:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top