कोरोना संसर्ग: परभणी जिल्ह्यातील शाळा, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
X
परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाचे वाढते आकडे पाहता पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या सुद्धा वाढत असल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी जिल्ह्यातील शाळा २८ फेब्रुवारी पर्यंत तर आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा आदेश काढला आहे.
परभणी जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात नवीन 31 रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण ८ हजार २४७ रुग्णांची नोंद झाली आहे. ७ हजार ७४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३२० रुगणांचा मूत्यू झाला आहे. सध्या १७८ रुग्ण उपचार घेत आहेत. आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये ३७, खासगी रुग्णालयात ३८ आणि होम आयसोलेशनमध्ये १०३ रुग्ण उपचार घेत आहेत.