Home > News Update > बुलडाणा जिल्ह्यातील 'स्त्री' रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

बुलडाणा जिल्ह्यातील 'स्त्री' रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

बुलडाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा
X

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ऑक्सिजन चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त रुग्ण क्षमता असलेल्या स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन साठा आज रात्री पुरेल एवढाच उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी माहिती दिली. आज रोजी दिवसाला सहा ते सात KL ऑक्सिजन ची गरज भासत असून आज रात्रीपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे उद्या नागरिकांची व रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तात्काळ ऑक्सिजन चा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

जिल्ह्यात आज रोजी शासकीय रुग्णालयात 5 हजारांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून यातील बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन ची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात ऑक्सिजन चा पुरवठा न झाल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्याला तात्काळ ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात आज आज रोजी 5 हजार 624 कोव्हिड रुग्ण जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णालायत उपचार घेत असून आज पर्यंत 318 रुग्णांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे ,

Updated : 15 April 2021 8:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top