Home > News Update > अखेर परमबीर सिंग नरमले, भारतातच असल्याची कोर्टापुढे दिली कबुली

अखेर परमबीर सिंग नरमले, भारतातच असल्याची कोर्टापुढे दिली कबुली

अखेर परमबीर सिंग नरमले, भारतातच असल्याची कोर्टापुढे दिली कबुली
X

कोर्टाने फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर भारतातच आहेत, अशी माहिती आता स्वत: त्यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालायने फटकारल्यानंतर परमबीर सिंह यांनी कोर्टापुढे आपण भारतातच असल्याची माहिती दिली आहे. पण मुंबईत दाखल झालो तर आपल्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने आपल्याला अंतरिम संरक्षण द्यावे अशी विनंती त्यांनी केली. यानंतर कोर्टाने परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यापासून संरक्षण देत त्यांना दिलासा दिला आहे.

न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. यावेळी परमबीर सिंह यांचे वकील एड. पुनीत बाली यांनी परमबीर सिंह मुंबईत आले तर त्यांच्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका असल्याची भीती असल्याचे सांगितले. तसेच सिंह हे भारतातच आहेत, अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिल्यानंतर आरोपीने तपासात सहकार्य करावे, त्या दरम्यान त्यांना अटक केली जाणार नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

या सुनावणीमध्ये कोर्टाने परमबीर सिंह विरुद्ध अनिल देशमुख यांच्या संघर्षावरही आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात समोर येणारी वस्तुस्थिती हे खूपच धक्कादायक आहे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री या दोघांमधील वादही खूपच गंभीर वळणावर आला असल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह कुठे आहेत याची माहिती जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत त्यांच्या याचिकेवर कोणताही निर्णय देता येणार नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. त्यानंतर परमबीर सिंह यांनी आपण भारतातच असल्याची कबुली दिली आहे.


Updated : 22 Nov 2021 2:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top