'यापुढे गरिबांच्या कल्याणासाठी काम करू'- आर्यन खान
X
NCB ची कार्डेलिया क्रूझवर आर्यन खान याच्यावरील कारवाई आणि त्याला जामीन मिळणार की नाही, याबद्दल देशभर चर्चा सुरू आहे, त्यातच स्वतः आर्यन यापुढे व्यसनापासून दूर राहून जबाबदार नागरिक बनण्याची ग्वाही अधिकाऱ्यांना देत आहे. NCB चे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांकडून त्याचे समुपदेशन करण्यात येत आहे.
दरम्यान यापुढे 'गरिबांच्या कल्याणासाठी काम करू' असं आर्यन खानने म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे.आर्यन हा प्रत्येक अधिकाऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो, आपण यापुढे व्यसनापासून दूर राहू, समाजातील गरीब, वंचित घटकांच्या मदतीकार्य करत राहू, अशी ग्वाही त्याने अधिकाऱ्यांना दिली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आर्यन आणि ७ जणांवर दोन NGO आणि अधिकाऱ्यांकडून NCB चे कार्यालय आणि आर्थर रोड तुरुंगात जाऊन समुपदेशन करण्यात येत आहे, त्यांना ड्रग्जपासून दूर राहण्यासाठी 'एनजीओ'तर्फे मदत करण्यात येत आहे. या तरुणांना समीर वानखेडे यांच्यासह अन्य अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून ड्रग्जचे दुष्परिणामाबद्दल माहिती दिली जात असून, त्यापासून परावृत्त केले जात आहे. हा NCB च्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. समुपदेशनाला आर्यन खान सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.