Home > News Update > नागपूर विधानपरिषद निवडणूक येत्या १० डिसेंबरला होणार मतदान

नागपूर विधानपरिषद निवडणूक येत्या १० डिसेंबरला होणार मतदान

नागपूर विधानपरिषद निवडणूक येत्या १० डिसेंबरला होणार मतदान
X

नागपूर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण 562 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज दिली आहे.

सध्याचे विद्यमान आमदार गिरीश व्यास यांचा 1 जानेवारी 2022 ला कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने 10 डिसेंबरला निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपालिका सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती मतदार आहेत. मतदारांची संख्या 562 असून, या मतदारांच्या हाती निवडणुकीतील उमेदवारांचे भाग्य राहणार आहे.

महानगरपालिकेचे 251 नगरसेवक आहेत. 5 नामनिर्देशित सदस्य धरून एकूण नगरसेवकांची संख्या 156 आहे. जिल्हा परिषदेचे 58 जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर 13 पंचायत समितीचे 13 सभापती, नगरपालिका व नगरपरिषदांचे 336 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी विमला यांनी सांगितले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

मतदानाची तारीख – १० डिसेंबर

मतमोजणी – १४ डिसेंबर

उमेदवारी अर्ज – १६ ते २३ नोव्हेंबर

माघारीचा दिवस – २६ नोव्हेंबर

Updated : 11 Nov 2021 12:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top