Home > News Update > अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येईल- आ. राधाकृष्ण विखे

अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येईल- आ. राधाकृष्ण विखे

अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येईल- आ. राधाकृष्ण विखे
X

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या पापाचे घडे भरले आहे. आपली पापे झाकण्यासाठी ईडी ,सीबीआय यांच्यावर दोषारोप करण्याचे काम सरकारमधील मंत्री करत आहेत, या संस्थाना बदनाम करायच्या आणि आपण जो काही भ्रष्टाचार केला आहे तो लापवायचा केविलवाणा प्रयत्न करायचा असा पण या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये असं भाजप आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.

सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येईल, कोणी किती महसूल गोळा केला आहे हे देखील समोर येणार आहे असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे.

आ. विखे पुढे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षामध्ये किती किंमत आहे. हे लोकांना देखील माहित आहे. ज्यांना सरकारमध्ये आणि पक्षामध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल काय बोलणार?असं विखे म्हणाले. तसेच राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आपल्या जिल्ह्यातल्या देखील एक मोठा मंत्री त्यामध्ये अडकलेला आहे. लवकरच ते प्रकरण देखील बाहेर येणार आहे असं ते म्हणाले.

त्याचबरोबर नगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपने पूर्ण ताकतीने सर्व नगरपालिका लढवण्याचा निर्णय घेतला आहे असेही आमदार विखे म्हणाले.

Updated : 18 Oct 2021 5:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top