Home > News Update > अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियम बद्दलचा अमित शहांचा तो जूमला

अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियम बद्दलचा अमित शहांचा तो जूमला

पाऊसमुळे IPL चा या मोसमतील शेवटचा सामना ३ दिवस चालला, या सगळ्यात नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये अपुऱ्या सुविधा असल्याचं पाहायला मिळालं, यातच आत्ता या स्टेडियम च्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचं अनेक नेटकर्यांच म्हणंन आहे.

अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियम बद्दलचा अमित शहांचा तो जूमला
X

३० मे रोजी संपन्न झालेली आय.पी.एल. ची फायनल चेन्नई सुपरकिंग्ज या संघाने जिंकली , या विजयासह CSK संघाने ५ व्यंदा विजेतेपदाचा मान मिळवला आहे, चेन्नई सुपकिंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स मध्ये झालेल्या अंतिम लढतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलच, मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सामना पुन्हा सुरू करण्यासाठी मैनानावर उपलब्ध असलेल्या अपुऱ्या सुविधा आणि त्यासाठी केलेलं जुगाड याचाही नेटकर्यांनी चागलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.

पावसामुळे काही काळ सामना थांबल्यामुळे सामना पुन्हा सुरू व्हावा याकरित मैदानात साचलेल पाणी काढण्यासाठी मैदानात Hover kaver, आणि super soccer सारखी मशीन नसल्याचं दिसून आलं, त्या एवजी मैदान कर्मचाऱ्यांनी साचलेल पाणी काढण्यासाठी बादली तसेच, स्पंज आणि खेळपट्टी सुखवण्यासाठी घरघुती वापरातील हेअर ड्रायर वापरल्याच दिसून आलं.

एक लाखापेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानाच उद्घाटन भारताचे माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या हस्ते करण्यात आल होत, उद्घाटनावेळी अमित शाहा यांनी केलेल्या भाषणात मैदानात उपलब्ध असलेल्या सुविधाबद्दल माहिती दिली होती, त्यामध्ये अमित शाहां यांनी कितीही पाऊस पडला तरीही सामना ३० मिनिटाच्या आत सुरू करता येऊ शकतो याचं बरोबर स्टेडियम मध्ये उपलब्ध असलेल्या आनेक सुविधांची माहिती दिली होती असे असले तरी मात्र काल झालेल्या आय.पी.एल. च्या अंतिम सामन्यात या सुविधा कुठेच दिसल्या नसल्याचं प्रतेय आला, मैदानाच्या काही भागात डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्या सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं,

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या B.C.C.I (Board of Control for Cricket in India) वर या घटनेमुळे या सगळ्यात ब्रश्र्चार झाला असल्याचं म्हटलं जातं आहे.

Updated : 31 May 2023 10:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top