Home > News Update > आठ हजार फॉलोअर्स असलेलं जगातलं सर्वांत चर्चित ट्वीट

आठ हजार फॉलोअर्स असलेलं जगातलं सर्वांत चर्चित ट्वीट

आठ हजार फॉलोअर्स असलेलं जगातलं सर्वांत चर्चित ट्वीट
X

सध्या मार्को नावाच्या व्यक्तीचं ट्विट जगभरात चर्चेत असून त्याला 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. आता तुम्ही म्हणाल मार्कोने असा काय तीर मारला आहे. होय मार्कोने तीरच मारला आहे. आणि मार्कोने मारलेला तीर अगदी बरोबर लागला आहे. जग सध्या ज्या कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडलं आहे. त्या कोरोना व्हायरसची भविष्यवानी मार्कोने 3 जून 2013 लाच केली होती.

म्हणजे सुमारे 7 वर्षापुर्वीच केली होती. मार्कोने 3 जून 2013 ला संध्याकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये मार्कोने Corona virus....its coming असं म्हटलं आहे. मार्कोचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोक त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. Professor buddy ने एक ट्वीट केलं असून या ट्वीटमध्ये त्याने राहुल गांधींचा फोटो पोस्ट केला असून राहुल यांच्या या फोटोला 'हे भाऊ हात पाहा आणि सांग, पंतप्रधान कधी होईल'.



असे अनेक प्रश्न मार्कोला विचारले गेले आहेत.

Updated : 7 May 2021 12:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top