Home > News Update > कोरोना कमी होतोय : केंद्र सरकारच्या समितीचा दावा

कोरोना कमी होतोय : केंद्र सरकारच्या समितीचा दावा

कोरोना कमी होतोय : केंद्र सरकारच्या समितीचा दावा
X

मार्च महीन्यापासून देशात कोरोनाचे संक्रमन सुरु झाले. त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन घोषीत करावा लागला. आता टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल केला असताना सध्याच्या परीस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वोच्च पातळीवर असून मार्चमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनचा देशातील रोगाचा प्रसार कमी होण्यावर प्रभावी परिणाम झाला आहे. तथापि, पुढील लॉकडाऊन कदापी करु नये अशी समितीने शिफारस केली आहे. सरकारने नियुक्त केलेल्या वैज्ञानिक समितीने म्हटले आहे की कोविड -१९ ची साथ आता शिगेला पोहोचली आहे आणि आता ती कमी होत आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत प्रादुर्भाव कायम राहील असा समितीचा अंदाज आहे. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने देशातील साथीच्या रोगाचा आढावा घेण्यासाठी संगणक मॉडेलचा वापर केला आहे. यामध्ये सप्टेंबर महीन्याच्या मध्यावर हा आजार सर्वाच्च पातळीवर होता. भारतात संक्रमणाची एकूण संख्या 106 लाख (10.6 दशलक्ष) पेक्षा जास्त होण्याची शक्यता नाही.

आतापर्यंत भारतात 75 लाख लोकांना संसर्ग झाला असून त्यातील जवळजवळ 66 लाख लोक बरे झाले आहेत. या समितीने असा दावा केला आहे की मार्चमध्ये लादलेल्या लॉकडाऊनचा देशातील रोगाचा प्रसार कमी होण्यावर प्रभावी परिणाम झाला आहे. लॉकडाऊन नसता तर मृत्यूची संख्या २ लाखांवर गेली असती, असे या अहवालात म्हटले आहे. या आजारामुळे भारतात आतापर्यंत १.१४ लाख लोक मरण पावले आहेत. तथापि, पुढील लॉकडाऊनची गरज नाही, अशी समितीने शिफारस केली आहे.

त्यांचा कोणताही विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही.समितीने असे म्हटले आहे की आगामी सणासुदीचा काळ आणि हिवाळ्यामुळे लोकांमध्ये या संसर्गाची तीव्रता वाढू शकते. म्हणूनच सध्याचे कोरोनापासून संरक्षणात्मक उपाय चालू ठेवण्याची शिफारस केली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आज सकाळी 24 तासांत कोरोनाव्हायरसच्या प्रसारात आजारात रोज ६१,८७१ वाढ झाली असून, एकुण कोरोना रुग्णांची संख्या-75-लाखांच्या जवळ गेली आहे. देशातील कोविड रिकव्हरी दर सुधारून ८८टक्क्यांवर आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Updated : 18 Oct 2020 5:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top