Home > News Update > तांत्रिक अडचणीमुळेच कोरोना लसीकरणास स्थगिती : महापौर किशोरी पेडणेकर

तांत्रिक अडचणीमुळेच कोरोना लसीकरणास स्थगिती : महापौर किशोरी पेडणेकर

तांत्रिक अडचणीमुळेच कोरोना लसीकरणास स्थगिती : महापौर किशोरी पेडणेकर
X

कोरोना लसीकरणाबाबत कालपासून उलटसुलट बातम्या येत असताना मुंबई प्रथम नागरीक महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोव्हिन अ‍ॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या सुधारण्यासाठी १७ आणि १८ जानेवारीला लसीकरण स्थगित करण्यात आलं आहे. कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये, असे आवाहन केलं आहे.

त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत की, लसीकरणाची ऑफलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यामुळे अ‍ॅपच्या तांत्रिक अडचणी दूर करुन लसीकरण सुरू होईल. पूनावाला कार शेडला केंद्र सरकार व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य निश्चितच मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेतील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. कोरोना कमी झाला आहे, संपला नाही आहे. मुंबई हे दाटी वाटीच शहर आहे सर्व शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय आम्ही सोमवार नंतरच घेणार आहोत.

तांत्रिक अडचणीमुळेच कोरोना लसीकरणास स्थगिती : महापौर किशोरी पेडणेकर

जो पर्यंत आंतिम आदेश येत नाही महानगर पालिकेचे तो पर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकांचे ही मत ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मुलांच्या जीवाची खेळण्याचा हक्क कोणला नाही. पाचवी ते आठवी पर्यंतची मुलं देखील लहानच आहेत आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहोत. अशी प्रतिक्रिया त्यांनी शाळाप्रवेशावरुन बोलताना दिली.


Updated : 17 Jan 2021 4:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top