आजपासून पुन्हा मिशन लसीकरण
देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीचे संकट येत असतानाकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज १ मार्चपासून शासकीय तसेच खाजगी आरोग्य संस्थांमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात ५५० शासकीय आणि १०० खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
X
सध्या राज्यात केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्या खाजगी आरोग्य संस्था ह्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांमध्ये सहभागी आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा अधिक ज्यांना सहव्याधी आहेत आणि ६० वर्षांपर्यंत व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे.
या वयोगटातील व्यक्तींसाठी प्री सेल्फ रजिस्ट्रेशन व अपॉइंटमेंट घेणे तसेच ऑनसाईट अपॉइंटमेंट आणि लसीकरण करुन घेणे, कोविन ॲप द्वारे लसीकरणासाठी वेळ निश्चित केली जाणार आहे.
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण मोफत असेल तर खाजगी आरोग्य संस्थांमध्ये त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत खाजगी आरोग्य संस्था यूजर फी म्हणून १०० रुपये व लसीची किंमत म्हणून १५० रुपये असे एकूण २५० रुपये प्रति डोस प्रति व्यक्ती असे शुल्क आकारणार आहे
राज्यात सद्यस्थितीमध्ये पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे
१ मार्चपासून वापरात येणाऱ्या कोविन ॲप विषयी केंद्र शासनाने शासकीय व खाजगी आरोग्य संस्थांचे प्रशिक्षण घेतले आहे.
राज्य स्तरावरून सर्व जिल्हा व महापालिका लसीकरण अधिकारी यांचे उद्यापासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचे तसेच कोविन ॲप च्या वापराविषयी प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
लसीकरणासाठी ४५ वर्षापेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे.
वय वर्ष ४५ ते ५९ ज्यांना सहव्याधी आहे ( कोमॉरबीड) आणि ६० वर्षावरील व्यक्तिंना लसीकरण करणार असून नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
लसीकरण केंद्रावर येताना आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांनी एम्प्लॉयमेंट सर्टीफिकेट अथवा कार्यालयीन ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.