Corona Update : देशातील कोरोना रुग्णवाढीचा दरही घसरला, मृतांची संख्या वाढली
कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख उतरणीला लागला असल्याचे दिलासादायक चित्र असले तरी मृतांची संख्या वाढत असल्याने देशाची चिंता वाढली आहे.
X
गेल्या काही दिवसात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. मात्र सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. याबरोबरच कोरोना रुग्णवाढीचा दरही घसरला आहे. त्यामुळे ही दिलासादायब बाब आहे. मात्र मृतांची संख्या वाढत असल्याने देशाचे टेन्शन वाढले आहे.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लागला असला तरी देशात मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 35 हजार 532 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 871 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह देशात कोरोना रुग्णवाढीचा दर 13.39 टक्के इतका घसरला आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दराने 16 टक्क्यांचा आकडा गाठला होता. मात्र त्यात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पाचशेच्या घरात असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येने 871 इतकी नोंद केली आहे. दरम्यान 20 लाख 4 हजार 333 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात गेल्या 24 तासात 3 लाख 35 हजार 939 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह देशात नागरीकांना 165 कोटी 4 लाख 87 हजार 260 लसींचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान कोरोनाचा आलेख घसरत असताना B.A2 आणि निओकोव या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. मात्र या नव्या व्हेरियंटचा प्रसार किती वेगाने होऊ शकतो, याबद्दल तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.